वैनगंगा, कन्हान, आम, मुर्झा, कोलारी या पाच नद्यांच्या संगमावर वसलेले चैतन्येश्वर मंदीर
येथील महादेवाची (लीन्गपिंड ) ही सापीन केलेली नसून ती यज्ञातून स्वयंप्रगट झालेली आहे.
येथेच श्री हरिनाथ शिष्य रामचंद्र उर्फ रघुनाथ यांची जिवंत समाधी आहे.
याच समाधीसमोर महाराष्ट्रातील मराठीचा आद्य ग्रंथ ‘विवेकसिंधू ‘ तसेच पर्मामृंत, पावनविजय, हे ग्रंथ आद्यकवी मुकुंदराज महाराज यांनी शके १११० मध्ये याच ठिकाणी लिहिलेले असून ते येथे विक्रीस उपलब्ध आहेत.
तसेच वाचनीय धार्मिक पुस्तके विक्रीस उपलब्ध आहेत.
देवस्थान राहण्याच्या खोल्या तसेच स्वयपकास भांडे, बेड, सतरंज्या किरायाने मापक दारात मिळतात.